Saturday, October 28, 2017

MPSC अभ्यास कसा करावा मार्गदर्शन

अभ्यास कसा करावा 

प्रिय विद्यार्थी मित्रानो ,
                            आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये   लाखो स्पर्धकांच्या मधून एक नोकरी मिळवणे हा खरोखरच प्रत्येकाच्या समोर मोठा प्रश्न उभा आहे.  आपल्याला नोकरी मिळावी व आपण देखील आयोगाच्या परीक्षामध्ये यशस्वी व्हावे उत्तम   पगार असावा. समाजामध्ये  मानसन्मान आपल्याला मिळावी. आपण देखील आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे  आणि मानसन्मान पैसा , प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन समाजासाठी   करण्याची तळमळ प्रत्येकाच्या मनात  असते. 
        या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अभ्यास करा ....अभ्यास करा .... असे प्रत्येक जन सांगतो , परंतू अभ्यास कसा करावा असे कोणीच सांगत नाही. या क्षणाला अभ्यास कसा करावा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत.  बघा सध्याच्या परीक्षेमध्ये आयोग वेगवेगळ्या परीक्षेची जाहिरात काढते परंतू या परीक्षेची जाहिरात आणि परीक्षेची तारीख यामध्ये अतिशय मर्यादित अंतर असते. या मर्यादित कालावधीत सविस्तर अभ्यास करून आपण या परीक्षेमध्ये टिकून राहिले पाहिजे हे खरोखरच आपल्या कष्टाची परीक्षा असते. हे एक प्रकारचे  युद्धच असते, या युद्धामध्ये योध्या ला चार लढया लढ्याच्या असतात. पी.एस.आय.बनण्यासाठी प्रथम तुम्हाला पूर्व परीक्षा , त्या नंतर मुख्य परीक्षा , शारीरिक चाचणी व शेवटी मुलाखत या चार लढया कराव्या लागतात.या लढयामध्ये आपण थोडेसे जरी गाफील राहिलो तरी आपल्या जीवनातून फार मोठी संधी निघून जाते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डार्विन म्हणतात कि जो संघर्ष करतो तोच जिवंत राहतो.हा सिद्धांत स्वताच्या जीवनामध्ये वापरा . .....
PSI/STI/ASST या पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा घेते या पदाच्या मुख्य परीक्षेत थोडा फार बदल असला तरी पूर्व परीक्षेमध्ये सारखाच अभ्यासक्रम आहे. साधारणतः या परीक्षा चार टप्प्यात घेतल्या जातात. 
पूर्व परीक्षा -
एकूण प्रश्न संख्या - १५० गुण- ३००  वेळ १:३० तास 
प्रश्नाचे स्वरूप -  हेप्रश्न  वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.
प्रश्न पत्रिका दर्जा - माध्यमिक शालान्त परीक्षेवर आधारलेले असतात.
वयोमर्यादा - १९ वर्ष पूर्ण असावेत .
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापिठाची  पदवी .

आपण या वेबसाईट च्या माध्यमातून पूर्व परीक्षेच्या बद्दल माहिती जाणून घेत आहोत.
आपण केवळ पूर्व परीक्षेच्या संदर्भात चर्चा करीत आहोत या परीक्षेतील हा पहिला टप्पा म्हणून ओळखला जातो. या टप्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज भीती असते.काही विद्यार्थ्यांच्या मनात असा समाज असतो कि , दोन तीन वेळा परीक्षा दिल्या तरी यश मिळत नाही परंतु अनुभवअंती असे लक्षात आले कि योग्य नियोजन , मार्गदर्शन, दर्जेदार अध्ययन साहित्य व सतत परिश्रम याची जोड मिळाल्यास परीक्षेमध्ये यश प्राप्त करणे फार कठीण नाही. या परीक्षेच्या बद्दल अभ्यासाची काही मंत्र आहेत त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने जप केल्यास यश त्यांच्या पायावर लोटांगण घेतल्याशिवाय राहणार नाही. ते मंत्र पुढील प्रमाणे --

अभ्यास मंत्र 

१) विद्यार्थ्यांची मनोवृत्ती -  स्पर्धा परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या मनोवृत्ती वर अवलंबून असतात.मनोवृत्ती म्हणजे मानवी गरज होय. जो पर्यंत विद्यार्थ्याला स्वतः ला आपण काही बनावसे वाटत नाही तो पर्यंत या स्पर्धा परीक्षेचा प्रवास निश्चित होत नाही. थोडक्यात विद्यार्थ्याला ही नोकरी मिळवावयाची गरज वाटली पाहिजे आणि जेव्हा त्याची ही गरज निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया येथून सुरु होते.
आपल्या अनेक गरजांपैकी आपल्याला स्पर्धा परीक्षेची प्रथम गरज वाटायला पाहिजे. ही तुमची मनोवृत्ती असेल तर आपोआपच आपले पाउल सकारात्मक दिशेने पडतात.
२) विद्यार्थ्यांची महत्वकांक्षा -   स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठी महत्वाकांक्षा असायला हवी कारण मोठी स्वप्न पाहणारी विद्यार्थीच मोठे बनतात. जे विद्यार्थी यशस्वी बनण्याचे स्वप्न पाहतात त्याच विद्यार्थ्यांना यश प्राप्त होते आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेना घाबरतात ,आपल्याकडून जमणार नाही , झेपणार नाही असे अगोदरच मनात भीती निर्माण करतात ते विद्यार्थी यशस्वी बनू शकत नाही. त्यासाठी आपल्याजवळ मोठी महत्वाकांक्षा असणे आवश्यक आहे .अशा मोठ्या महत्वाकांक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वाटचाल करीत असताना कोणत्याही अफवांना बळी पडायला नको  कारण स्पर्धा परीक्षेची तय्यारी करणारे आणि अयस्वी ठरलेले विद्यार्थी नेहमी नकारात्मक घंटा वाजवत असतात .अशा पासून सावध राहणेच बरे व आपला आत्मविश्वास डगमगणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .

३) अभ्यासाची तल्लीनता:-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची गरज निर्माण झाली व पुढे त्याची महत्वाकांक्षा देखील वाढली आता खरी गरज आहे ती अभ्यासाची व त्या अभ्यासामध्ये तल्लीन राहण्याची अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या नावाने एकत्र येतात , खोली करतात ,सामुहिक रीतीने अभ्यास साहित्य खरेदी करतात आणि पुढे लवकरच अभ्यासाला सुरुवात होते. एकाच खोलीमध्ये अभ्यास करणारे चार मित्र असतील तर एकाचा मूड नसतो , एक मोठ्याने वाचतो , एक झोपलेला असतो. हे मित्र वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात आणि मग एकत्र बसलेल्या ग्रुप स्टडीतील ही तल्लीनता काही वेगळीच दिसून येते. अशा पद्धतीने अभ्यास होत नसतो. अभ्यासामध्ये एकाग्र होवून अभ्यास करावयाचा असतो .पूर्णपणे एकरूप होऊन एकाग्रतेने अभ्यास केल्यास कमी कालावधी मध्ये देखील खूप अभ्यास होऊ शकतो.  

4) अभ्यासाची क्रियाशीलता :-   हा अभ्यासातील चौथा मंत्र म्हणून ओळखला जातो. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्चित केले किवा प्रखंड महत्वाकांक्षा मनाशी निश्चित केली तेव्हा मात्र अशी महत्वाकांक्षा मनाशी निश्चित केली तेव्हा मात्र अशी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सतत क्रियाशील असणे आवश्यक आहे .अनेक विद्यार्थी ध्येय निश्चित करतात परंतु त्याची सुरुवात करण्यासाठी विशिष्ट मुहूर्ताची वाट पाहत राहतात. यावर माझा असा अंदाज आहे कि ज्या वेळी तुमच्या मनात चांगले कार्य करण्याची इच्छा निर्माण झाली तीच वेळ चांगले कार्य करण्याचा मुहूर्त असतो. नाहीतर भविष्यामध्ये मी केले असते तर बरे झाले असते असे भविष्यामध्ये मनाचे  समाधान करून घेण्यास काही अर्थ राहत नाही . आपल्याला स्पर्धा परीक्षेची तय्यारी ही चालू वर्तमान काळामध्ये करणे आवश्यक आहे. मनात एकदा अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली तर ते बनण्यासाठी सातत्याने कृती केली पाहिजे.

५) अभ्यासाचे सातत्य :-   पाचवा मंत्र - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख एक दोष दिसून येतो तो म्हणजे त्यांच्याजवळ असलेल्या सातत्याचा अभाव. एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना अनेक विद्यार्थी मधेच अभ्यास बंद करतात. आणि आपले लक्ष दुसर्याच नोकरीकडे केंद्रित करतात. यामध्ये एक ना धड बारा चिंध्या अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून मनाची सातत्य फार महत्वाचे आहे .

६) वेळेचे नियोजन :- सहावा मंत्र – हा स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. स्पर्धा परीक्षेसाठी फोर्म भरणारे डी. डी. काढणारे बँक समोर तासान तास उभे राहणारे अनेक विद्यार्थी दिसतील परंतु अभ्यास करणारे बोटावर मोजण्याएवढेच असतात. वेळ हा सर्वांसाठी सारखाच आसतो त्यामुळे वेळ मिळत नाही म्हणून मी यशस्वी होत नाही. हे म्हणणे योग्य ठरणार नाही. आपल्याला मिळणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन करा परीक्षेची तारीख अभ्यासासाठी मिळणारे दिवस अभ्यासक्रमाची व्याप्ती यांची योग्य सांगड घाला. यामध्ये रिविजन , पाठांतर , पेपर , जुन्या प्रश्नपत्रिका इ. अनेक सर्व गोष्टींसाठी ठराविक वेळ द्या. वेळापत्रक तयार करून त्याचे प्रामाणिकपणे पालन करा. आजची गोष्ट उद्यावर ढकलू नका. म्हणजे यश आपल्याकडे येईल .

७) संधी सोडू नका :- अभ्यास मंत्र सातवा – प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा ही एक चालून आलेली महत्वाची संधीच असते. ही संधी पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात येत नाही. आजचा दिवस , आजची वेळ पुन्हा कधीच येत नसते याची जाणीव ठेवा. त्यामुळे या परीक्षेमध्ये जमले नाही तर पुढची परीक्षा देईल असा आशावाद करत बसू नका. आलेली परीक्षा हीच आपली अंतिम परीक्षा आहे असे समजून संधीचे सोने करा. एकदा कि तुमच्या हातून एखादी परीक्षा पास होण्याची संधी सुटून गेली तर ती संधी परत येत नाही याची जाणीव ठेवून अभ्यास केला पाहिजे.

८) स्वतः ला कमी लेखू नका :– अभ्यास मंत्र आठवा -  स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी गरीब आहे मी विशिष्ठ जाती धर्मात जन्माला आलो असे समजून स्वतः ला कधीच कमी लेखू नका . आपण मानव जातीमध्ये जन्माला आलो हेच सर्वात मोठी पात्रता तुमच्या जवळ आहे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी आज यशस्वी अधिकारी झालेले दिसतात .केवळ परिस्थितीला दोष न देता रडत न बसता ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल .

कामयाबी उन्हीको मिलती है | जिनके खाबोमे जान होती है | पंखो से कुछ नही होता | होसले से उडान होती है | 

No comments:

Post a Comment