रिलायंस जीयोने ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत फोनची ऑफर देण्यात आली आहे यासाठी काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील
आपण जर तीन वर्षानंतर ९० दिवसाच्या आत फोन परत केल्यास अनामत रुपये मिळतील. समजा ९० दिवसांच्या आत फोन परत केला नाही तर त्या व्यक्तीची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
फोन घेतल्या नंतर दरवर्षी १५०० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे म्हणजेच तुम्हाला तीन वर्षासाठी ४५०० रु. रिचार्ज करण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत हे कोठे ही सांगण्यात आलेले नाही.
जिओ फोन मध्ये काहीही बदल करता येणार नाही सोफ्टवेअर बदलता येणार नाही असे बेकायदेशीर ठरेल.
जिओ फोन वापरत असाल तर कंपनीला तुम्ही कुठे आहात हे नेहमी माहित असेल. कारण लोकेशन संबंधित नोटिफिकेशन आणि माहिती देण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार आहे.
हा फोन तीन वर्षानंतर परत करावा लागणार असल्याने तुम्ही फोनचे मालक नाही. तुम्हाला हा फोन विकता येणार नाही. तसेच कंपनीने जाहीर केलेल्या नियमानुसार हा फोन वापरावाच लागणार आहे.
निश्चित केलेल्या तीन वर्षांच्या आत ग्राहक हा फोन परत करु शकतात. मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट १५०० रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.
No comments:
Post a Comment