Saturday, October 28, 2017

हिवाळ्यात अशी घ्या हातांची काळजी



ऑक्टोबर महिना सुरु झालाय म्हणजेच हिवाळ्याची सुरुवात झाली आहे थंडी जाणवायला लागलेली आहे .कामात आपले हात नेहमी उघडे असतात त्यामुळे हात खडबडीत व मऊपणा नष्ट होतो , तुमच्या हाताला मऊ ठेवायचे असतील तर खास उपाय आहेत .
रात्री झोपताना हाताला खोबरे तेल लावा पहा सकाळी तुम्हाला हात तजेलदार दिसतील 
अंघोळीसाठी आपण साबण वापरतो , साबण हा ऑलिव्ह ऑइल असलेलाच विकत घ्या.
व्हिनेगरच्या वापरामुळे देखील हात मऊ होतात त्याचा वापर केला तरी चालेल.
तुम्ही आहारात पाणी योग्य प्रमाणात पीत असाल तर त्वचा नरम आणि मृदु राहते.
हाताना लवकर मऊ करण्यासाठी नियमित मॉश्चराइजर लावा.मॉश्चराइजर लावल्याने हाताची सुकलेली त्वचा चांगली होते. 
हातावर नैसर्गिक उत्पादनाचा जास्तीत जास्त वापर करा. केमिकल्स शक्यतो वापरू नका.बटर, कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल वापरावे. हँन्ड लोशन वापरावे.

No comments:

Post a Comment